महाराष्ट्र शासन


Vasantrao Naik Government Institute of Arts & Social Sciences

Samvidhan/R.B.I. Square, Pt. Nehru Marg, Civil Lines, Nagpur 440001

Accredited with Grade "B++" with 2.91 CGPA by NAAC

Affiliated to Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur

About Department

इ. सन १९२७ साली मराठी विभागाला सुरुवात झाली.श्री एस.एन.बनहट्टी हे पहिले मराठी विभाग प्रमुख होते (१९२७-१९४४).त्यानंतर डॉ.वि.भि.कोलते (१९४४-१९६४), डॉ. शरच्चंद्र मुक्तिबोध (१९६४-१९७९), डॉ.सुरेश डोळ्के (१९७९-१९८०), डॉ.मालती पाटील (१९८०-१९९८), डॉ.सुनंदा देशपांडे (१९९८-१९९९), डॉ.लता मिसर (१९९९-२००३), डॉ.लता लांजेवार (२००३-२००९), डॉ.जनार्दन काटकर (२००९-२०१६), डॉ.सुनिता सुळेकर (२०१६-२०१८) यांनी मराठी विभाग प्रमुख पद भूषविले. सध्या डॉ.विशाखा कांबळे (२०१८) या मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

विभागाने अनेक थोर साहित्यिकांना घडविले.त्यात डॉ.गंगाधर पानतावणे, श्री. वामन कृष्ण चोरघडे, श्री.पु.भा.भावे, श्री.ग. त्र्यं.माडखोलकर, डॉ.वि.भि.कोलते, श्री.ना.घ.देशपांडे, श्री.रामघोडे, डॉ.द.भि.कुलकर्णी, श्री.के.ज.पुरोहित, श्री. भास्कर नंदनवार, डॉ.रवींद्र शोभणे, डॉ.प्रकाश खरात, डॉ. आशा सावदेकर, डॉ.ज्योती लांजेवार, प्रा.वसंत पुरके, डॉ.जुल्फी शेख, डॉ.लता लांजेवार, डॉ.विशाखा संजय कांबळे यांचा समावेश आहे.

विभागात आतापर्यंत डॉ.भ.श्री.पंडित, डॉ.यशवंत मनोहर, ज्येष्ठ प्रा.माणिक गोडघाटे (कवी ग्रेस), डॉ.सुधा साठे, डॉ.विजया डबीर, प्रा.डॉ.श्रीमती चंद्रज्योती भंडारी, डॉ.सुभाष वाघमारे, डॉ.अशोक थोरात, डॉ.जनार्दन काटकर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. सुनिता सुळेकर, डॉ. रजनी तोंडचीरकर-हुद्दा, श्री. समाधान सातव इत्यादी प्राध्यापकांनी अध्यापन केले आहे.

विभागातून आतापर्यंत जवळपास ३० विद्यार्थी नेट/सेट/जे.आर.एफ.परीक्षा उत्तीर्ण होऊन विविध नामवंत महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.त्यात वादविवाद स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा, कविसंमेलन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, मराठी स्वाक्षरी स्पर्धा,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व कविसंमेलन इत्यादी.

नटसम्राट नाटकाचे प्रथम प्रयोग दिनांक २४ जानेवारी २०२३ ला तर दुसरा प्रयोग स्नेहसंमेलनानिमित्त २६ एप्रिल २०२३ ला सादर करण्यात आला. तिसरा प्रयोग २७ फेबुवारी २०२४ ला मराठी भाषा गौरव दिना निमित्त स्वातंत्र्यभवन येथील रंगभूमीवर दुपारी १२:३०सादर करण्यात आला. नाटक सादरीकरणाची संकल्पना मा.डॉ.मनोहर कुंभारे (संचालक-वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था नागपूर) यांची होती. या नाटकाचे दिग्दर्शक डॉ.विशाखा संजय कांबळे यांनी केले.तर संगीत डॉ.बुध्दरत्न लिहीतकर व वरद लोंढे, दीपक बोराडे यांनी दिले. नेपथ्य - ज्योत्सना गजभिये, वेशभूषा-चंदा बोरकुटे,केशभूषा- शुभांगी लामसोंगे यांनी केले. नटसम्राट नाटकात अप्पासाहेव - चेतन निगुटकर, कावेरी– संजना नागराळे , नंदा–जय जाधव शारदा - ऋतुजा कुमरे,नलू - तेजस्विनी सदावर्ते,सुधाकर - सुशांत ठाकरे, ठमी - मेहर निमगडे,आसाराम - पियुष पोहे या कलाकारांनी काम केले.

डॉ. विशाखा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे चार विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत.(कोमल बरके – NET (JRF), जोत्सना गजभिये, अरविंद धनविजय, माहेश्वरी लाडे)

मराठी विभागात सध्या डॉ. विशाखा संजय कांबळे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉ. सुधीर मोरे, डॉ. उत्तरेश्वर सुरवसे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मराठी विभागात डॉ. छोटू पुरी, डॉ. स्नेहलता मूल, डॉ.चंद्रकांत बावनकुळे, श्री. अरविंद धनविजय, कु. ज्योत्सना गजभिये, श्रीमती शुभांगी लामसोगे, डॉ. ओमप्रकाश पंचभाई, डॉ. रंजना महाजन इत्यादी अंशकालीन प्राध्यापक कार्यरत आहेत.

मराठी विभाग प्रमुख              
डॉ. विशाखा संजय कांबळे            
वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था,नागपूर


मराठी विभागाचे उद्दिष्टे

१. विद्यार्थ्यांचे भाषिक, सामाजिक जागृती व संवर्धन करून व्यावसायिकतेकडे मार्गक्रमण करण्यास प्रवृत्त करणे.

२. विद्यार्थ्यांना मराठी भाषा व संस्कृती यांच्याबद्दल रुची निर्माण व्हावी म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करणे.

३. मराठी विभागाच्या योजनेअंतर्गत साहित्य, संस्कृती, कला, इतिहास यासारख्या विषयांवर वैचारिक, सामाजिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक या विषयांच्या अनुषंगाने अतिथीचे व्याख्यान आयोजित करणे.

४. विद्यार्थ्यांमध्ये आत्मबल निर्माण करण्याकरिता विद्यार्थ्यांमधील व्यावहारिक जीवनमूल्ये जपण्याचा आग्रह व उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे.

५. विद्यार्थ्यांना इतरांशी संवाद साधण्याचे कौशल्य,यादृष्टीने विशिष्ट कार्यक्रमांचे आयोजन करणे.

६. सांस्कृतिक कार्यक्रम-नाट्य,नृत्य, गायन, इत्यादी कलागुणांची जोपासना करणे. ७. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारभाषा, प्रशासनिकभाषा, ज्ञानभाषा या तिन्ही स्तरांवर मराठी भाषेचा सर्वांगीण वापर वाढविण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करणे.

८. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेतून नव्या ज्ञानाची निर्मिती होण्यासाठी परिभाषेची घडण, निरनिराळ्या ज्ञानस्तोत्रांची उपलब्धी करून भाषेचा सर्जनशील वापर वाढविणे.इत्यादी कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे.

९. ग्रामीण व आदिवासी भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा भाषा विकास व व्यावसायिक विकास करण्यासाठी विविध कार्यशाळा व चर्चासत्रे आयोजित करून प्रोत्साहन देणे.

१०. विभागातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या विकास करणे.

११. शासनांच्या योजनेची माहिती देणे व त्यांना उपयुक्त ठरेल याकरिता सहाय्य करणे.

१२. विद्यार्थ्यांची ध्येय प्रवृत्ती जागृत करून विकास वाटचालीकडे दक्षतेने लक्ष देणे.